वाघाचा तीन युवकांवर हल्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ, दि. १६ मार्च: यवतमाळ जिल्ह्यातील अती दुर्गम परिसरातील झरी तालुक्यातील वाढोणा बंदी येथे वाघाने तीन युवकांवर हल्ला केल्याने हे युवक जखमी झाले आहे.

हे युवक शेतात काम करत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला आहे. पैंकू मडावी, अजय आत्राम आणि प्रकाश आत्राम असं या जखमी युवकांचे नाव आहे. या युवकांना पांढरकवडा येर्थील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. दरम्यान सर्वांची प्रकुती स्थिर आहे. झरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होत आहे. याच परिसरातील चिंचघाट येतील शेतशिवारात वाघाने दोन बैलांवर हल्ला केला आहे. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत आहेत. नागरिकांनी या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.

Tiger Attack