अहेरी उपविभागात टाईगर्स स्वयंसेवी संस्था लोकांसाठी देवदूतच!

रुग्णसेवेसाठी झटत आहेत कार्यकर्ते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिण भागात कार्यरत असलेल्या टाईगर्स स्वयंसेवी संस्था मार्फत अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, मूलचेरा, भामरागड या पाचही तालुक्यात गोरगरिबांना वेळेवर मदतीचा हात मिळत आहे.

या दक्षिण भागातील गरजू रूग्णांना रक्ताची गरज असेल अथवा आपत्कालीन परिस्थिती मध्ये रुग्णांना वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी भरती करणे, अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना तातडीने रुग्णालयात भरती करणे, याशिवाय रुग्णांवर उपचाराअंती रुग्ण दगावल्यास त्यांना पोस्टमार्टेमसाठी मदत करणे व गावपातळीवरील काही घटनेत दगावल्यास पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात शव आणणे आणि परत त्याच्या गावी पोहोचून देणे. अशा सर्व प्रसंगात टाईगर्स स्वयंसेवी संस्था मदतीसाठी तत्पर आहेत.

टाईगर्स स्वयंसेवी संस्थेचे कार्य गेल्या ४ वर्षांपासून अहेरी उपविभागात आहे सुरू

अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरजू रूग्णांना रक्ताची गरज भासली की रुग्ण टाईगर्स स्वयंसेवी संस्थेला संपर्क करतात. कार्यकर्ते वेळीच रक्ताची अथवा रक्तदात्याची व्यवस्था करून देतात. आतापर्यंत टाईगर्स स्वयंसेवी संस्थेचेच्या माध्यमातून १८०० हुन अधिक रूग्णांना निःशुल्क रक्तपुरवठा करण्यात आला आहे.

अहेरी, भामरागड, मूलचेरा, एटापल्ली या तालुक्यात लोक अपघात झाल्यास तात्काळ टायगर्स स्वयंसेवी संस्थेला संपर्क करतात. वेळेस स्पॉटवर कार्यकर्ते पोहचून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करतात.

२ नोव्हेंबर २०२० रोजी एक रुग्णवाहिका जिल्ह्याचा लोकसेवेसाठी टायगर्स स्वयंसेवी संस्थेतर्फे आणण्यात आली आहे. आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून अपघातात जखमी झालेल्या २६ लोकांना रुग्णालयात पोहचवून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहे. अहेरी तालुक्यात शववाहिका नसल्याने ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी आलेले आतापर्यंत १२ शव निशुल्क घरी सोडून देण्यात आले.

टाईगर स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदत देणाऱ्या मध्ये साई तुलसिगारी, दौलत रामटेके, श्रीकांत जल्लेवार, आदर्श केशनवार, रुपेश श्रीरामवार, गणेश येलमुले, गणेश मोहुर्ले,  कुणाल वर्धलवार, सुरज दुर्गे,  हसन खान पठाण, राजकुमार चुदरी, सार्थक आत्राम, आकाश सिडाम, राजू सिडाम हे कार्यकर्ते गरजूंना मदती करता सदैव तत्पर असतात.

हे देखील वाचा :

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

 

 

lead storyTigers Group