गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना योध्यांवर उपासमारीची वेळ

  • विविध रिक्तपदा अंतर्गत सेवेत समाविष्ट करण्याची मागणी
  • गडचिरोली जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ०२ जानेवारी: आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना महामारी काळात राज्यात आरोग्य विभागात विविध सहयोगी पदावर नियुक्ती होऊन कोरोना योद्धांनी सेवा दिली. मात्र, सेवा देणाऱ्या या कोरोना योद्धावर सेवा समाप्तीची वेळ येऊ शकते, असा सर्व कोरोना योद्धा सेवाकर्मीना सामाजिक सुरक्षा व मानव अधिकाराच्या आधाराने आरोग्य विभागातील विविध रिक्तपदा अंतर्गत सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

जीवाची पर्वा न करता दहशतीचा वातावरणात कोणत्याही सामजिक सुरक्षावर मानवी सुरक्षा शर्ती व अटीशिवाय आपली सेवा प्रदान करून राज्यातील जनतेला सुरक्षा व आरोग्य विभागातील सेवेस अत्यंत मोलाचे योगदान दिले. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने आता काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले जाऊ शकते.

जिल्ह्यात आधीच आरोग्य विभागातील हजारो रिक्त पद असल्याने मानव व अन्य संसाधन अभावाने या कोरोना संकटाचा सामना करणे एक आव्हान होते. या सर्व जागा भरून काढण्यात  या सेवाकर्मींचे मोठे योगदान आहे. त्याकरिता आरोग्य विभागातील रिक्त पदातील काही सेवा पदावर अशा सेवाकर्मींना पूर्णवेळ कार्यरत म्हणून नियुक्ती देवून सामाजिक सुरक्षा प्रदान करणे शासनाची जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे गोंदिया जिल्हाधिकारी यांनी कोविड कर्मचारी यांना रिक्त पदावर पात्रतेनुसार सामावून घेण्यात यावे असे निर्देश दिलेले आहे. त्याच धरतीवर गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना योद्धांना सेवेत सामावून घेतले तर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास हातभार लागेल.

Dipak Singla