मामाच्या त्रासाला कंटाळून भाच्याने संपविली जीवनयात्रा

अमरावती जिल्ह्यातील म्हेसपूर येथे घटना, मामासह आरोपी अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती डेस्क २४ डिसेंबर:- अमरावती जिल्ह्यातील म्हेसपूर येथे एका मुलाने मामाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्याने लिहलेल्या चिठ्ठीमध्ये हा सगळा प्रकार उघड झाला असल्याने पोलिसांनी मामासह अन्य आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मंगेश शेलोकार असे मृतकाचे नाव आहे. मंगेश आपल्या कुटुंबासह मामाच्या गावाला राहत होता. दरम्यान मामासह याच्या कुटुंबातील सदस्यांकडून वारंवार शेलोकार कुटुंबाला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने मंगेशने आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या चिठ्ठी वरून हा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठला असता त्याच्यापुढे हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.