श्रमाप्रतिष्ठेला मूल्य देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्वतः पेरणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

लातूर : सध्याला निसर्गाच्या या अवकृपेत शेती ही नुकसानीत जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचे पोर शेतीपासून दूर जाताना दिसत आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना त्यांना पेरणी सुरू असलेल नजरेस पडले आणि त्यांनी संबंधित मुरुड येथील शेतकरी उध्दव सव्वाशे यांच्याशी बोलून समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज वी पी यांनी श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देण्यासाठी स्वत: ट्रॅक्टरवर BBF तंत्राने सोयाबीनची पेरणी केली.

उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी BBF तंत्राची सविस्तर माहिती दिली. ब्रॉड बेस फ्रो अस हे तंत्रज्ञान असून कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालयात यावर संशोधन करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे यामुळे पिकांत अंतर राहून जमिनीत ओलावा राहतो तर अतीवृष्टी झाली तर पाणी सहजपणे वाहून जाते. यासोबतच सोयाबीन पिकांवर रोगाचा धोका संभावल्यास औषधाची फवारणी करणे सहज सोपे जाते. या पद्धतीने उत्पादन घेतल्यास उत्पादनात वाढ होत आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक गावांना शासनाच्या पोखरा योजनेत पेरणी यंत्र दिलेले असून शेतकऱ्यांनी भाड्याने का असेना या तंत्राचा वापर करताना BBF यंत्राचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

उपस्थित शेतकरी आणि त्यांची पोर व कृषी विभागाचे अधिकारी यांना देखील आश्चर्य वाटलं पण श्रमाशिवाय फळ नाही याची जाणीव स्वतः जिल्हाधिकारी यांनी कृतीतून दाखवून दिले असून जिल्ह्यात सर्वत्र जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम आदी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

तहसीलदारांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई

दिलासादायक! Paytm कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी खास सुविधा; त्वरित मिळेल ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

 

 

Agriculturecollector prithvirajlead story