लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
किनवट 26, डिसेंबर :- या ना त्या कारणाने किनवट तहसील कार्यालय आणि तहसीलदार रोजच चर्चेत असतात. यातच भर म्हणून तहसील कार्यालयातील प्रसाधन गृहास कुलूप लावलेले असल्याने गाव खेड्यावरून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे।
तहसील कार्यालायशेजारी जवळपास कुठेही प्रसाधनगृह उपलब्ध नाही. जर तुम्हाला प्रसाधनास जायचं असेल तर छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय किंवा जुने नगर परिषद कार्यालयात जावं लागेल, कारण तेथेच सार्वजनिक प्रसाधनगृह उपलब्ध आहे. तहसीलदार यांच्या केबिनमध्ये अटॅच प्रसाधनगृह असल्याने त्यांना तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या त्रासाची जाणीव नाही. तहसील कार्यालयात ज्या ठिकाणी पाण्याचा नळ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुठका थुंकल्याचे निदर्शनास येत आहे. एकीकडे सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बध लावण्याचा विचार करत असताना तहसील कार्यालयातच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
हे देखील वाचा :-