अमरावती, २० नोव्हेंबर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगल सफारी दरम्यान काही पर्यटकांना एका वाघांचे दर्शन झाल्याच एक व्हिडिओ समोर आला आहे. आता दिवाळी नंतर मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढत असून अनेक पर्यटकांना वाघांचे दर्शन होत आहे. तीन दिवसांपूर्वीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील धारगड बोरी जंगलात एकाच वेळीं चार वाघांची पर्यटकांना साईड रायटिंग बघायला मिळाली होती. एकाच वेळी चार वाघ दिसल्याने पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
सध्या दिवाळी नंतर आता मेळघाट मध्ये पर्यटकांची गर्दी हळुहळू वाढू लागली आहे. त्यात अनेक प्राणी प्रेमी पर्यटक हे वैराट जंगल सफारी ला प्राधान्य देत आहेत. अशातच काल काही पर्यटक हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगल सफारी करत असताना त्यांच्या नजरेस एक वाघ दिसला यावेळी त्या पर्यटकांनी वाघाचा रूबाब आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.