किनवटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली; अधिकाऱ्यांमध्ये कारवाईएवजी स्मशानाची शांतता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

किनवट 28 एप्रिल:- राज्यभरात वाढत्या करोना रुग्णांमुळे मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावले. व लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिवनावश्यक सेवेतील दुकानांना त्यात मुभा देली. तसेच या ठिकानी गर्दी होऊ नये याची जबाबदारी स्थानीक प्रशासनाला दिली. मात्र स्थानीक प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला फाट्यावर मारल्याच चित्र सध्या किनवटमध्ये पहायला मिळतय.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईची गती मुख्यमंत्र्यांनी घातलेल्या निर्बंधानंतर कमी झाल्याच चित्र पहायला मिळतय. राज्यभरात या कडक निर्बंधांचे पालनही होतय. पण नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याला मात्र या कडक निर्बंधातुन मुभा देण्यात आली का? असा प्रश्न येथील परिस्थिती पाहता उपस्थित होतोय. कापड दुकाण,मोबाईल गॅलरी,गॅरेज,शोरुम,सलुन अशाप्रकारे जवळपास सर्व मार्केटच मागच्या दरवाज्याने आणि अर्ध शेटर उघडुन चालु असल्याची परिस्थिती किनवटमध्ये आहे. आणि महत्वाच म्हणजे हे सर्व प्रशासनाच्या डोळ्यासमोर चाललय आणि अधिकारी मात्र याकडे सपशेल डोळेझाक करतायत. नगर परिषदेचे अधिकारी तर ‘आली लहर,केला कहर’ या म्हणीप्रमाणे कधी मनात आल तर आपल्या नव्या हवेशीर नगर परिषद ईमारतीच्या बाहेर येऊन व्यापाऱ्यांना दंड ठोठावतात.यासाठी त्यांच कौतुकही करावस वाटत,पण यातही मोठी गंमत आहे. आणि ती म्हणजे हे अधिकारी काही ठरवलेल्या व्यापाऱ्यांनाच टार्गेट करत असल्याची चर्चा आहे.

सोशल डिस्टन्सिंग, मास्क न वापरने , विनाकारण गर्दी करणे यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि शासनाने दिलेले आदेश मोडण्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेशही दिले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाची आकडेवारी:-

  • ॲंटीजन टेस्ट-9709
  • पाॅजिटीव्ह-2030
  • आर.टी.पि.सी.आर.-1962
  • पाॅजिटीव्ह-403
  • मृत्यु-6

मोठ्या शहरांच्या दृष्टीने विचार केल्यास ही आकडेवारी कमी वाटेल,पण एका तालुक्याच्या दृष्टीने ही आकडेवारी चिंताजनक आहे. आज राज्यभरात जवळपास साडेचार लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी अडीच हजार रुग्ण हे केवळ किनवटमध्ये आहेत. राज्यभरातील कोरोनाची ही परिस्थीती असुनसुद्धा कडक निर्बंधांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त, ना प्रशासनाची, ना कोरोनाची भीती बाळगत फिरत आहेत. या नागरिकांवर किंवा व्यावसाईकांवर कारवाई करण्यासाठी कोणीच याठिकानी दिसत नाही. रस्त्यांवर केवळ आणि केवळ गर्दी दिसत आहे. तेथे ना पोलिस, ना महसूल प्रशासन, ना पालिका प्रशासन, ना ग्रामपंचायत प्रशासन, ना प्रांताधिकारी, ना तहसिलदार, ना पोलिस अधिकारी, ना गटविकास अधिकारी, ना मुख्याधिकारी, ना तलाठी, ना ग्रामसेवक आहे, मग कारवाई कोणी करायची तरी कोणी?

शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन केल्यास पुढच्या महिण्यात आपल्यालाही दुकाण उघडता येतील या आशेवर काही व्यापारी निर्बंधांचे पालन करतायत.पण या परिस्थितीवर नगर परिषद व अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने हे निर्बंध काढले जातील का? यावर व्यापारी चिंता व्यक्त करतायत. तर काही व्यापारी शासनाने घातलेल्या निर्बधांचे पालण करणारे आपनच मुर्ख आहोत म्हणुन काही व्यापारी नैराश्यात जात आहेत.

covid 19croudgroesary shopkinvatlockdown 2naded policeno social disatance