जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमीत्य पोलीस चौकी आलापल्ली येथे वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी, दि. १५ जून : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मौजा आलापल्ली येथील पोलीस चौकीच्या प्रांगणात पद्मभुषन जेष्ट समाजसेवक तथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन प्रणेते अण्णा हजारे यांच्या ८४  व्या वाढदिवसानिमीत्य अहेरी प्राणहिता येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोलजी ठाकूर,
अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण डांगे, आलापल्ली वनपरीक्षेञाचे वनपरीक्षेञाधीकारी गणेश लांडगे, एपीआय बाळासाहेब शिन्दे, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, गाव तंटामुक्त अध्यक्ष सुरेश गड्डमवार, सामाजीक कार्यकर्ता अमोल कोलपकवार, आर. टी. आईंचवार, जगन्नाथ मडावी मेजर, शंकर डांगे मेजर, यादव मेश्राम मेजर, धर्मेन्द्र मेश्राम मेजर, आलापल्ली येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, से. नि. सहाय्यक वनसंरक्षक तथा तालुका अध्यक्ष भ्र. वि. ज. आ. मोहन मदने , जेष्ट पञकार प्रकाश दुर्गे, जेष्ट पञकार प्रशांंत ठेपाले, पञकार स्वप्नील श्रीरामवार, रोहीत हर्षे, आदीत्य खरवडे, राहुल ओंडरे व अऩ्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी उपस्थीत पोलीस निरीक्षक प्रविणजी डांगे व मान्यवरांंनी अण्णा हजारे यांच्या महान कार्यावर व त्यांचे जिवन शैलीवर प्रकाश टाकला. तेव्हा वनाचे महत्व व पर्यावरण  या विषयावर थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी अण्णा हजारे यांंनी राष्ट्रहिता करिता केलेले कार्य वर्षानुवर्षे आठवणीत राहतील व अण्णा हजारे यांच्या अथक परीश्रमातून त्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी व देशव्यापी आंदोलनातून ग्रामसभा, माहितीचे अधिकार, दप्तर दिरंगाई, बदली विनिमयाचा कायदा, व अन्य कायदे जनतेच्या हिताकरीता शासनास करण्यास भाग पाडले, जे की अण्णा हजारे यांनी जनतेच्या न्याय हक्कासाठी मिळवून दिलेले अधिकार म्हणजे कधीही न संपणारं देणं आहे. अशा शब्दात वर्णन केले. व अण्णा हजारे यांना दिर्घायुष्य लाभावं या करीता प्रार्थना करण्यात आली.

वृक्षारोपण करताना कोरोना परीस्थीतीचा भान ठेवून प्रत्येकाने तोंडावर मास्क लावून सुरक्षीत अंतर ठेवून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता भ्र.वि.ज.आ.च्या कार्यकर्त्यानी अथक परीश्रम घेतले. सदर झाडांचे योग्य संरक्षण करण्याचे पोलीस कर्मचा-यानी आश्वासन दिले.

हे देखील वाचा :

वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी उपलब्ध करून द्या

दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही तर 43 कोरोनामुक्त, 29 नवीन कोरोना बाधित

कोविड योद्धे श्रमजीवी युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी

 

Anna hajarelead storyPolice Chouki AllapalliVijay Kharwade