जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीच्या वतीने वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ जून : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे जिल्हा गडचिरोलीच्या वतीने देसाईगंज वडसा पंचायत समिती येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

सध्या सर्वत्र covid-19 चा वाढता प्रादुर्भाव, प्राणवायूची पडत असलेली कमतरता आणि वाढत असलेले वायू प्रदूषण त्यासाठी यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे व वृक्षारोपण करणे. त्याच अनुषंगाने बार्टी मार्फत दिनांक ५ जून ते २० जून या कालावधीत वृक्षारोपण पंधरवडा चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात बार्टी मुख्यालय पुणे इथून महासंचालक धम्मज्योति गजभिये यांच्या हस्ते करण्यात आली आहे. बार्टी मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून जिल्हा प्रकल्प अधिकारी व समतादूत यांच्या मार्फत लोकसहभागातून हे वृक्षारोपण शासनाच्या आदेशानुसार सामाजिक अंतर ठेऊन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी गटविकास अधिकारी श्रावण सलाम, एस. ए. थोटे कृषी अधिकारी, यु.एम.चिलबुले विस्तार अधिकारी पंचायत, एस. एन. गडमले कनिष्ठ सहाय्यक, एम. डब्ल्यू. राऊत कनिष्ठ सहाय्यक, एस. डी. कुमरे, सी. एस. मेश्राम, के. जी. पिलारे शिक्षिका, एम.एम. मिसार शिक्षिका, एन.एम. अंबादे शिक्षिका, कमल गेडाम शिक्षिका, मा. टी. ती. बिसेन नायब तहसीलदार SDO ऑफिस, अशोक मेश्राम सफाई कामगार, मनीष गणवीर प्रकल्प अधिकारी बार्टी, कुमारी वंदना धोंगडे समतादुत देसाईगंज आदींची उपस्थिती होती.

याठिकाणी झाडाचे महत्व व प्राणवायूचे महत्व समजावून सांगण्यात आले, या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी समतादूत प्रकल्प गडचिरोली च्या वतीने आभार व्यक्त केले.

lead storyManish Ganveer