सामाजीक वनीकरण योजना अंतर्गत लावलेली वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर

  • आजणसरा हिवरा मार्गावरील प्रकार
  • वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, 26 डिसेंबर: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र हिंगणघाट योजना अंतर्गत आजणसरा हिवरा या 3 कि.मी च्या मार्गावर वर्ष 2018-19 ला रस्त्याचे दुतर्फा एक हजार वृक्षाची लागवड करण्यात आली होती. या कामासाठी राज्य शासनाचा लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. परंतु वनीकरण विभागाच्या हिंगणघाट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वृक्ष संगोपणाकडे दुर्लक्ष केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी आजणसरा हिवरा या 3 किमी चे मार्गावर करंजी, पिंपळ, शिवण साग, कडू निंब सारख्या शतायुषी वृक्षाची एक हजार झाडे लावण्यात आली होती, तसेच वृक्ष संगोपनासाठी प्लास्टिक जाळी व बांबूचा वापर करण्यात आला होता. परंतु संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने झाडांना लावलेल्या जाळ्या व बांबू नामशेष झाले आहे. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात अनेक शेतकरी शेताच्या धुऱ्याला आग लावत असल्याने शेकडो वृक्ष जाळून खाक झाली आहेत, तर अनेकांनी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने झाडाची मोडतोड केली आहे.

आजणसरा हे गाव संत भोजाजी महाराजांचे तीर्थक्षेत्र असल्याने यास्थळी येणाऱ्या भाविकांना स्वच्छ सुंदर व हिरव्यागार सावलीचा आसरा मिळावा म्हणून राज्य शासना कडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते, परंतु आज या रस्त्याने मार्ग क्रम केला असता भकास स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथील उपसरपंच नरेंद्र पाटील यांनी वृक्ष संगोपनासाठी लावण्यात आलेल्या जाळ्या,बांबू चोरून नेनाऱ्यांवर व झाडानची जाळपोळ  मोडतोड करण्यारांवर व या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवार वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देवून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Hinghanghat Forest Range