सातपाटी मध्ये बोट मालकाकडून आदिवासी मजुरावर कामासाठी जुलूम जबरदस्ती.

आरोपी बोट मालका विरोधात वेठबिगरी विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.

श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे वेठ बिगारीच्या पाशातून आदिवासी मजुराची झाली सुटका.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर / दि. ४ डिसेंबर: पत्नीच्या आजारपणामुळे घरी थांबलेल्या खलाशावर कामावर येण्यासाठी जुलूम जबरदस्ती करून, त्याला घरात कोंडून मारहाण करणाऱ्या सातपाटी गावातील मच्छिमार व्यावसायिक व त्याच्या मुलाविरोधात वेठबिगारी विरोधी [The Bonded Labor System (Abolition) Act,1976] कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश पांडुरंग तरे व त्याचा मुलगा विशाल रमेश तरे असे या आरोपी पिता पुत्रांची नावं आहेत. त्यांच्या विरोधात पीडित शैलेश दिवाळ रोहनकारव (32) या मजुराच्या फिर्यादीनुसार व श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपाटी हे गाव मोठं  मच्छिबंदर असल्याने गावात अनेक बोट मालक, मच्छिमार व्यावसाईक आहेत. येथील बोटीत काम करण्यासाठी अनेक खलाशी कामगार ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातून येत असतात. शैलेश रोहनकार, हा पालघरच्या रामपाडा येथे राहणारा तरुण ऑगस्ट 2020 पासून सातपाटी येथील रमेश पांडुरंग तरे यांच्या बोटीवर खालाशी म्हणून कामाला होता. तेथे तो मासेमारी हे काम करीत असे. ऑगस्ट पासून आज पर्यँत त्याने 5 ते 6 फेऱ्या समुद्रात मारल्या होत्या, एका फेरी साठी समुद्रात अंदाजे 10 ते 12 दिवस लागतात. परंतु दरम्यानच्या काळात खलाशी शैलेश याची पत्नी आजारी असल्याने तिच्या उपचारासाठी शैलेश तिच्या सोबत मागील काही दिवस दावखान्यात होता. परंतु बोटीवर एक फेरी शिल्लक असल्यामुळे  मालक रमेश तरे त्याला सतत फोन करून कामावर येण्यासाठी एखादा लावत होता.

शैलेशची पत्नी आजारी असल्यामुळे तिला एकटीला सोडून कामावर जाणे त्याला शक्य नसल्याने त्याने शिल्लक राहिलेली 1 फेरी काही दिवसात पूर्ण करतो अशी विनंती मालक रमेश तरी त्याला केली होती. परंतु मालक सतत शैलेश ला कामावर येण्यासाठी फोन करून धमकावत होता. या सर्व गोष्टींना कंटाळून अखेर शैलेश ने ‘मी या पुढे इथे कामावर येणार नाही माझा हिशेब द्या” असे स्पष्ट करून केलेल्या कामाचा हिशेब घेऊन तिथून निघाला. परंतु या गोष्टीचा मनात राग ठेवून मालक रमेश ठाकरे चा मुलगा तरे व त्याचा मित्र तन्मय म्हात्रे या दोघांनी ३० नोव्हेंबर रोजी शिरगाव येथे शैलेशला कामावर ये आणि आता  घरी येऊन काय ते मालकाला सांग असे धमकावले, परंतु शैलेशने विरोध केला असता विशाल व मित्र तन्मय याने जबरदस्ती शैलेशला मोटर सायकलवर बसवून त्याच्या घरी घेऊन गेले. घरी बोट मालक रमेश तरे व मुलगा विशाल यांनी शैलशला कामावर येण्यासाठी जबरदस्ती करून मारझोड करू लागले आणि तो पळून जाऊ नये यासाठी शैलेश ला त्यांच्या घरातील एका खोलीमध्ये डांबून ठेवले. शैलेश ने फोनवरून झालेला प्रकार आपल्या नातलगांना कळवला, त्यांनी सातपाटी पोलीस स्टेशनला जाऊन हा प्रकार सांगितला व पोलिसांनी शैलेशला मालकाच्या तावडीतून सोडविले. परंतु मालकाने पैशाच्या जोरावर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

सदर घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांना कळताच त्यांनी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाने व संघटनेचे अरविंद रावते,शंकर वरखंडे, रोशन धांगडे, हरेश आरेकर, छबी जाधव व इतर सभासद यांच्यासोबत दि.3.12.2020 रोजी सातपाटी पोलीस ठाण्यात पोहोचून बोट मालक रमेश तरे व मुलगा विशाल तरे यांच्याविरोधात वेठबिगारी विरोधी कायद्याच्या कलम 16 अन्वेय व 374, भा.द.वि.स.कलम,341,342,323,506,34  गुन्हा दाखल केला.

एरवी जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम भागात वेठबिगारी ची प्रकरणे उजेडात येत असताना, पालघर जिल्ह्यातील प्रगत समजल्या जाणाऱ्या पालघर तालुक्यातील देखील आदिवासी बांधव वेगवेगळ्या प्रकारे वेठ बिगारीच्या पाशात अडकले आहेत, हेच सातपाटी येथील प्रकरणावरून उघडकीस आले आहे. श्रमजीवी संघटना असताना कोणाही गरीब मजुरांवर अन्याय होणार नाही, तसेच वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] ची कठोर अंमलबजावणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत वेठबिगारीची अनिष्ट प्रथा संपणार नाही असे मत श्रमजीवी चे पालघर तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांनी व्यक्त केले.

क्रिकेटचा खेळ मांडला कार्यालयीन वेळेत कार्यालया समोर. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित असलेल्या अल्लापल्ली विभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार.