डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विधानभवनात आदरांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई :  दि. 6 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज शुक्रवार, दिनांक 06 डिसेंबर, 2024 रोजी विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा.श्री.राहुल नार्वेकर व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) श्री.जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, अवर सचिव श्री. विजय कोमटवार, मा.उप सभापती यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी श्री रविंद्र खेबुडकर, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

हे ही वाचा,