भाजपा कार्यालयात वीरांगना राणी दुर्गावती यांना आदरांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात वीरांगना राणी दुर्गावती यांच्या बलीदान दिनानिमित्य त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी खा. अशोक नेते यांच्या हस्ते राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व हार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी आरमोरी विधानसभा चे आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा आदिवासी आघाडी चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, सदानंदजी कुथे भाजपा जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा सचिव संदिपजी कोरेत, आरमोरी चे तालुकाध्यक्ष नंदुजी पेटेवार, शहर महामंत्री विनोद देवोजवार, श्यामजी वाढई, उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

पोलीसांच्या कार्यक्षमता आणि मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन जिल्ह्यांना करून द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्य विभागास सूचना

राज्यात दरदिवशी ३ हजार मे.टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट

 

 

ashok netelead story