शाहूनगर येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 गडचिरोली : वंदनीय  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा  यांचा पुण्यतिथी महोत्सव शाहूनगर गडचिरोली येथे संपन्न होणार आहे.

श्री. गुरुदेव योग शिक्षण व सेवा समिती तथा संत नगाजी महाराज देवस्थान, शाहूनगर गडचिरोली यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सव व संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम १९ ते २१ डिसेंबर दरम्यान शाहू नगरातील संत नगाजी महाराज मंदिरात पार पडणार आहे.  शहरातील जनतेने या निमित्ताने घटस्थापना, सामुदायिक ध्यान, ग्रामगीता वाचन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

हे पण पहा ,