सिरकोंडा येथील विकासकामांचे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

  • ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सिमेंट कांक्रीट रस्त्यांसाठी निधी मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा, दि. १४ एप्रिल: तालुक्यातील सिरकोंडा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आविसं नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

      जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्याने सिरकोंडा ग्रामपंचायतीला आदिवासी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सिमेंट कांक्रीट रस्त्यांच्या बांधकामासाठी पंधरा लक्ष रुपयांचे निधी मंजूर झाले. ग्राम पंचायतीने या निधीतून गंगानूर टोला व सिरकोंडा येथे सिमेंट कांक्रीट रस्ते मंजूर केले. या रस्त्यांचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

       या भूमीपूजन सोहळ्याला जि.प.चे माजी सभापती व जि.प.सदस्या जयसुधा जनगाम, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, सिरकोंडा ग्रा.पं.चे सरपंच लक्ष्मण गावडे, उपसरपंच बिरा गावडे, मुल्ला गावडे, आविस सल्लागार रवी सल्लम, मदारामचे माजी सरपंच इरफा मडावी, सुधाकर पेद्दी, बामणीचे सरपंच अजय आत्राम, जाफराबादचे उपसरपंच तिरुपती दुर्गम, गरकापेठा ग्रा.पं.चे उपसरपंच दासरी वेंकटी, माजी सरपंच निलाबाई गावडे, जनगम सडवली, कारे वेलादी, पिडो गावडे, कापा गावडे, सीरिया गावडे, समस्स्या गावडे, गुंडा गावडे, पोरीय वरसे, गणपत गोमासी, बक्का वरसे, मासा गावडे, विजय गावडे, अशोक वरसे, वंजा तलांडी, सोनी गावडे, समक्का गावडे, रोहन अल्लूरी, संतोष दुर्गम, साई मंदा, किरण वेमुला, प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक, किरण चिंतला, राजाराम कारसपल्ली, वेंकटस्वामी रामटेके आदींची उपस्थिती होती.

zp ajay kankadalwar