भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकाच परिवारातील दोघांचा मृत्यू तर एक गंभीर,दोन किरकोळ जखमी

कार तीनदा पलटी झाल्याने आईचा जागीच मृत्यू तर सासूचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू.. हेमंत दोनाडकर (ग्रामसेवक) दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती..
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

आलापल्ली, 19 एप्रिल : भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकाच परिवारातील दोघांचा मृत्यू तर एक गंभीर,दोन किरकोळ जखमी झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील कुरुड वळणावर घडले आहे.

प्राप्त महिप्रमाणे वन विकास महामडळात निशा दडमल (दोनाडकर ) वनपाल या पदावर कार्यरत असून त्यांच्याच राहत्या वसाहतीमध्ये झोपल्या ठिकाणीं दि, 17 एप्रिल रोजी मोठ्या बहीणीला( सवतीला) पहाटे 4:00 च्या दरम्यान सापाने दंश केल्याने पहाटेच उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचारासाठी दाखल केले, मात्र प्रकुर्तीत सुधारणा दिसून येत नसल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र हेमंत दोनाडकर(ग्रामसेवक) यांनीअम्बुलंस न नेता आपल्या स्वतःच्या मालकीची कीआ कंपनीच्या कारनी पत्नी रक्षणा दोनाडकर (30), निशा दडमल( दोनाडकर) (30), जनाबाई दोनाडकर( 60) (आई ), चालुबाई दहागावाकार ( 62)सासू या  एकूण पाच जनाना आपल्या  कारमध्ये  घेवून गडचिरोलीकडे जात असताना चामोर्शी जवळील कुरुड वळणावर दि,18 एप्रिल  रात्री, ९:०० च्या सुमारास हेमंत दोनाडकर यांच्या वाहनावरील ताबा सुटून गेल्याने कार तब्बल रोड खाली दोन ते तीन पलटी खाल्याने वाहनातच जनाबाई दोनाडकरआईचा जागीच मृत्यू झाला.

तर कार मध्ये सासू चालूबाई दहागावकर यांचं गडचिरोली जिल्हा रुग्णालयातनेत असतांना प्राणज्योत मावळली तर सापाने दंश झालेल्या पहिल्या पत्नीला ब्रम्हपुरी येथील आस्था हास्पिटल येथील  रुग्णालयात दाखल केले असून प्रकुर्टी गंभीर असल्याची माहिती आप्त परिवाराकडून प्राप्त झाली आहे. तर हेमंत दोनाडकर (ग्रामसेवक) पती आणि दुसरी पत्नी निशा दडमल (दोनाडकर )किरकोळ जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदर घटनेची माहिती चामोर्शि पोलीस विभागाला होताच घटनास्थळ गाठून मोका पंचनामा करण्यात आला असून जागीच मृत्यू जनाबाई दोनाडकर यांना चामोर्शी रुग्णालयात शवविच्छेदन करून बिद्री येथे परिवाराला पार्थिव स्वाधीन करण्यात आले तर चालूबाई दहागावकर यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे शवविच्छेदन करून पेरमिली येथे परीवाला देण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा  पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि सासू यांचे जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून पार्थिव  परिवाराला देण्यात आले आहे. घटनेची माहिती परिवारासह इतरत्र माहिती होताच सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून सायंकाळपर्यंत अंतिम संस्कार करण्यात येत असल्याची माहिती आता परिवाराकडून प्राप्त झालेली आहे.

हे पण वाचा :-

allapalicar accidentgadchioli police