उपविभागिय पोलिस अधिकारी करत आहे चौकशी…
भंडारा, दि. १९ फेब्रुवारी: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगित दहा बालकांच्या मृत्यु प्रकरणात 39 दिवसानंतर 2 नैर्सेस वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून भंडारा शहर पोलिस स्टेशन मध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्मिता अंबिलडुके वय 34 व शुभांगी साठवने वय 32 वर्ष अशा गुन्हा नोंद झालेल्या अधीपरिचारिका यांचे नाव आहेत. त्यांच्यावर कलम 304 (पार्ट2) व 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा करीत आहे. विशेष म्हणजे ह्या दोन्ही नर्सेस अटक पूर्व जामीन साठी भंडारा न्यायालयात गेले असून 22 फेब्रूवारी रोजी त्यांच्या जामिनावर सुनावनी होणार आहे. त्यामुळे भंडारा पोलिस त्यांना अटक करणार का, हे बघने विशेष ठरेल.