जीबीएस आजारामुळे मिरज शासकीय रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सांगली: सांगलीतल्या मिरज शासकीय रुग्णालयात जीबीएस आजारामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बेळगावमधील १४ वर्षीय मुलगा आणि सांगोला इथल्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील हुक्केरी इथल्या वर्षीय तरुणाला जीबीएसची लागण झाली होती. त्याला ३१ जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथल्या रहिवासी ६४ वर्षीय रुग्ण महिला १३ तारखेला या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांना डायबिडीजचा त्रास होता, मध्यरात्रीमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
मिरज शासकीय रुग्णालयात रुग्णालयात १ जानेवारीपासून १२ रुग्ण दाखल झाले होते. त्यामध्ये ६ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश होता. त्यांच्यापैकी ९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकावर उपचार सुरु आहे, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी घाबरु नये, या आजारातून लोक बरे होत आहेत, केवळ नागरिकांनी लक्षणे दिसल्याचं तातडीनं उपचार घेण्याचं आवाहन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी केलं आहे.