उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील 1459 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा़र्‍यांच्या वेतनाचा मुद्दा लवकरच सोडविणार..

मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि ११ नोव्हें :- राज्यातील 148 उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील 1459 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा़र्‍यांचा वेतन मान्यतेचा प्रलंबित प्रश्न लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करून योग्य तो निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मुंबईत विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्च माध्यमिक शिक्षक पदास कायम वैयक्तिक मान्यता व नियमित वेतन मिळण्याबाबत बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव, व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव, संबंधित अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
148 उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील 1459 पदांना 15 एप्रिल 2015 ला उच्च स्तरीय सचिव समितीकडून मान्यता देण्यात आली असून सदर प्रश्नावर राज्यातील कर्मचाऱयांनी 150 रिट याचिका व अनेक अवमान याचिका 2013 पासून दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र अनेक वर्ष पाठपुरवठा करून हा प्रश सुटत नव्हता. दरम्यान, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात सतत बैठका घेऊन प्रलंबित असलेला पदाचा प्रश्न लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडून जलद निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.