७९ व्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचेकडून राज्यपालांना शुभेच्छा

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री यांनी केले अभिष्टचिंतन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. १७ जून  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिष्टचिंतन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महापौर किशोरी पेडणेकर, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, नारायण राणे, अरविंद सावंत यांनी देखील राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा :

नागपूर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनीं साठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता

इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाबाबत आरोग्यमंत्र्यांनी घेतली बैठक

नवजात बालकांची श्रवण शक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिट चावापर पुणे, गडचिरोली आणि जालना येथे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

CM Uddhav Thakaraylead storyRajyapal Bhagatsingh Koshyari