अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत सुनिश्चित वीजपुरवठ्यासाठी किफायतशीर: राज्यमंत्री यड्रावकर

गडचिरोली येथे महाकृषि ऊर्जा अभियानाचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ जानेवारी: राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह किफायतशीर व दिवसा सुनिश्चित विजपुरवठा करण्याच्या दृष्टीने तसेच दिर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या कृषि क्षेत्रासाठी जास्तीत जास्त वापर करण्याच्या हेतुने दि. २६ जानेवारी रोजी गणराज्य दिनानिमित्त महाकृषि ऊर्जा अभियान जाहीर केले. गडचिरोली जिल्हयातील या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे आरोग्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर यांनी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत सुनिश्चित वीजपुरवठ्यासाठी किफायतशीर असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी जिल्हयातील वीज परिस्थिती व वी पुरवठयाबाबत माहिती जाणून घेतली.

या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व इतर प्रवर्गातील एकुण ५ शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना मागणीपत्र देऊन मागणीपत्राचे पैसे भरल्यानंतर दि. १९/०२/२०२९ पर्यंत त्यांच्या शेतावर सौरकृषिपंप करण्याचे महाकृषि ऊर्जा अभियान अंतर्गत नियोजिले आहे. त्याकरीता सदर अभियान अंतर्गत सौरकृषिपंपांकरीता अर्ज केलेल्या लाभाथ्यांना मागणीपत्र देण्याचा कार्यक्रम काल प्रविभाग कार्यालय, महावितरण, गडचिरोली येथे आयोजित केलेला होता. सदर कार्यक्रमास ना. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर, राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग व सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र शासन, दिपकजी सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली,  कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, आशिष येरेकर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली, तिडके, जिल्हा नियोजन अधिकारी, गडचिरोली, सुरेंद्रसिह चंदेल, अरविंदजी कात्रटवार इत्यादी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये महाकृषि ऊर्जा अभियानाअंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यांपैकी श्री बिच्छु बाला सोयाम, रा. चिरेपल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली यांना ना. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्राबकर, राज्यमंत्री, सार्बजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग व सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र शासन यांचे हस्ते डिमांड नोट देण्यात आली. त्यानंतर रविंद्र गाडगे, प्रभारी अधिक्षक अभियंता, महावितरण, गडचिरोली यांनी महाकृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत सौरकृषिपंप जोडणी करण्यासंबंधीची माहिती दिली व सदरील जोडणी दि. १९/०२/२०२१ पर्यंत पुर्ण होईल असे आवर्जुन सांगितले. तसेच कृषिपंप बिज जोडणी धोरण २०२० बाबत देखिल सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमाकरीता पि.पि. मेश्राम, प्रभारी कार्यकारी अभियंता, महावितरण, आल्लापल्ली, तेलतुंबडे, प्रभारी कार्यकारी अभियंता, महावितरण, गडचिरोली, पराडकर, बुरडकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गडचिरोली तसेच वंजारी, कोल्हटवार, सहाय्यक अभियंता, महावितरण, गडचिरोली व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Dipak SinglaKumar AshriwadRajyamantri Yadravakar