खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते गडचिरोली येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 15 ऑगस्ट 2023 : गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांच्या शुभहस्ते आज १५ ऑगस्ट रोजी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, खा.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय,शिवकृपा पतसंस्था गडचिरोली या विविध ठिकाणी ध्वजारोहन संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ७६ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने,देश भावनेने प्रेरित होऊन,भारत मातेच्या गर्जनात साजरा करण्यात आला. प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,जेष्ठ नेते रमेश भुरसे,जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार,गजानन येनगंदलवार, अनिल कुनघाडकर, अनिल तिडके, मुक्तेश्वर काटवे,विनोद देवोजवार,विवेक बैस,अनिल करपे,योगिता पिपरे,वर्षा शेडमाके,प्राचार्य दुर्गम सर,तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते गण विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-