नाल्यात वाहून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाला ओलांडण्याचे धाडस बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर :  जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर दुथडी भरून वाहत असलेला नाला ओलांडण्याचे धाडस करणारे दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

कळमेश्वर शहराला लागूनच असलेल्या गोवरी रस्त्यावरील असलेल्या नाल्यावरी छोटा पूल ओलांडत असताना ही घटना घडली. अण्णा पुरुषोत्तम निंबाळकर (५०) आणि गुड्डू मधुकरराव शिंदे असे नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही कळमेश्वर तालुक्यातील गोवरी येथील रहिवासी आहेत. सुगीचे दिवस असल्याने हे दोघेही शेतीचे साहित्य आणण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेले होते.

पुरात वाहून गेलेल्या निंबाळकर यांना दोन मुले तर शिंदे यांना एक मुलगा एक मुलगी आहे. नाल्याच्या पलीकडे दुचाकी ठेऊन दोघांनीही पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नाल्यात उतरताच दोघेही वाहून गेले.

घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नायब तहसीलदार संजय भुजाडे, तलाठी सुरज साजदकर,  यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

घटनेची नोंद कळमेश्वर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरवरून आलेल्या रेस्क्यू टीमने दुपारनंतर बराच वेळ शोधकार्य केले. मात्र सायंकाळपर्यंत या दोघांचा कोणताही पत्ता बचावपथकाला लागला नाही.

हे देखील वाचा :

ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक

हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

lead story