आदिवासी सन्मानार्थ गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजीत ” गडचिरोली महा-मॅरेथॉन-2023” च्या लोगोचे अनावरण

05 मार्च 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 7 फेब्रुवारी :-गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुण युवक- युवतींना स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी, तसेच आदिवासी भागात विकास व्हावा यासाठी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने, दिनांक 05 मार्च2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेआहे. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण दिनांक 06-02-2023 पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, गडचिरोली प्रणिल गिल्डा यांचे हस्ते करण्यात आले.

या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत, समाजाच्या सर्व स्तरातून आबालवृद्धांच्या सुमारे10000 हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. सहभागी असलेल्या सर्व धावपटूंना किट, टी-शर्ट, मेडल्स, प्रमाणपत्र व विजेत्यांना रोख बक्षीस इ. देण्यात येणार आहे. सदर मॅरेथॉन स्पर्धेची तयारी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मा. अपर पोलीस अीक्षक (अभियान) अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी  यतीश देशमुख सा. व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या जवळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोस्टे / उपपोस्टे / पोमकं येथे संपर्क साधावा. या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी मोफत असणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. तसेच सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेची तयारी व व्यवस्था उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली  प्रणिल गिल्डा पाहत आहेत.

हे पण वाचा :- 

gadchiroli policegadchiroli sp