अरे च्या !.. उपसरपंच पदासाठी तब्बल दहा लाख पन्नास हजार रुपयाचा बोली.

नांदेड जिल्ह्यात लोकशाहीचा बाजार मांडल्याचे धक्कादायक प्रकार उघड.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड २४ नोव्हेंबर: -धक्कादायक नांदेड जिल्ह्यात लोकशाहीचा बाजार मांडल्याचे धक्कादायक बातमी उघड झालीय…जिल्हयातील मुदखेड तालुक्यातील महाटी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पद बोली लाऊन त्याची किंमत ठरवण्यात आलीय…उपसरपंच पदासाठी दहा लाख पन्नास हजार रुपये ही शेवटची बोली लावली गेली. या बोलीस गावकऱ्यांनी हिरवा कंदील दिला. अशाप्रकारे महाटी गावात उपसरपंच पदाचा लिलाव करून दहा लाख पन्नास हजार रुपयात हे पद गावकऱ्यांनी संबधिताला बहाल केले…महाटीगावचे सरपंच ओबीसीसाठी आरक्षित आहे ..

उपसरपंच पदाचा जाहीर लिलाव केल्याची बाब उघड झाली आहे…या लिलावाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात याची चर्चा सुरू आहे…मुदखेड तालुक्यातील महाटी हे गाव गोदावरीच्या काठावर असून या गावांमध्ये जिल्ह्यातील सर्वात जास्त वीटभट्ट्या आहेत. हे गाव गोदावरी काठी असल्यामुळे वाळू साठ्यासाठीही प्रसिद्ध आहे. या गावातून वाळू, वीट भट्टी व वीट भट्टीसाठी लागणाऱ्या मातीचा व्यवसाय कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत होत असते. यामुळे या गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मोठा भाव आला आहे…या प्रकरणाव आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेत हे पहावं लागणार आहे…