लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १८ नोव्हेंबर: राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे.
शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविध्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ७७.२५ टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. त्यात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविध्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शिक्षणाला वयाची अट नसते हे आपण नेहमीच अनुभवत आलो आहोत. वयाची शंभरी गाठल्यानंतरही अनेकांनी महाविध्यालयीन परीक्षा पास केल्याची उदाहरणे आपण ऐकुण आहोत. शिंदे यांनी शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे.