पेसा दिनाचे औचित्य साधुन कुकडेल येथे विविध कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि.२६ :- कोरची तालुक्यात येत असलेल्या दुर्गम नक्षलग्रस्त भागात असलेल्या कुकडेल येथे पेसा दिनाचे औचित्य साधुन ग्रामसभा आयोजित करण्यात आले होते . या सोबतच  दिनांक 23 ते 25 डिसेंबर 2020 दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
तालुक्यातील “वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे ( संघ) महाग्रामसभा” अंतर्गत येत असलेल्या समसेरगढ़ गटातील कुकडेल येथील भव्य पटांगणात ग्रामसभा कुकडेल, महाग्रामसभा तालुका कोरची व आम्ही आमच्या आरोग्यसाठी असलेली संस्था कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमासह पेसा समारोह साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे उद्घाटन, सनकेर तुलावी गाव पुजारी कुकडेल यांचे हस्ते पार पडले. यावेळी सह उद्घाटक म्हणून जगतराम नरोटे सामाजिक कार्यकर्ता, आंबेखारी होते. तर अध्यक्ष स्थानी मन्साराम नुरूटी ग्रामसभा अध्यक्ष कुकडेल .उपाध्यक्ष ,भारतजी नुरुटी पोलीस पाटील कुकडेल यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्गदर्शक म्हणून शुभदाताई देशमुख .कुरखेडा, कुमारी ताई जमकातन महाग्रामसभा सहसचिव कोरची होते. यावेळी प्रतिभाताई नंदेश्वर कुरखेडा कल्पनाताई नैताम महाग्रामसभा कोषाध्यक्ष कोरची झाडुराम हलामी महाग्रामसभा अध्यक्ष कोरची, ईजामसाय काटेंगे सामाजिक कार्यकर्ता कोरची सियारामजी हलामी महाग्रामसभा सल्लागार कोरची. यांची उपस्थिती होती .


दिनांक 23 ते 25 डिसेंबर रात्राकालीन पुरुषांचे भव्य क्लोज कबड्डी स्पर्धा तर दिनांक 24 डिसेंबर 2020 रोज गुरुवारला सकाळी 9.00 वाजता महिलांचे रांगोळी स्पर्धा, महिलांचे संगितखुर्ची स्पार्धा, दुपारी 12.00 ते 4.00 वाजेपर्यंत महिलांचे भव्य कबड्डी स्पर्धा घेण्यात आले. सायं. 4.00 ते 6.00 पर्यंत पेसा दिवस समारोह मार्गदर्शन व बक्षिस वितरण, भेट वस्तू देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी महिला कबड्डीत प्रथम जय दुर्गा महिला बचत गट नवरगाव या संघाने पटकाविला. प्रथम पुरस्कार स्व. कुसूमताई गोगुलवार यांचे स्मृती प्रित्यर्थ आ.आ.आ .कुरखेडा यांचेकडून 7001/-देण्यात आले. द्वितीय पुरस्कार जय माँ बाँम्लेश्वरी महिला बचत गट कुकडेल या संघाने स्व. प्रेमिलाताई देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ आ.आ.आ .कुरखेडा यांचेकडून 5001/-देण्यात आले. तृतीय पुरस्कार राणी दुर्गवती समूह झगळवाही या संघाने पटकाविला. स्व. वसंतराव गोगुलवार यांचे स्मृती प्रित्यर्थ आ.आ.आ.कुरखेडा यांचेकडून 3001/- देण्यात आले.
संगितखुर्चीत प्रथम ममता सुखदेव, द्वितीय करिश्मा हलामी व तृतीय देवकी कोवाची यांने पटकाविले .यांना विविध भेटवस्तू सह बक्षिस देण्यात आले.


रांगोळी स्पर्धेत प्रथम अंतकला अनिल नंदेश्वर, द्वितीय दर्शाना सहारे, तृतीय आचल राजकुमार नंदेश्वर यांनी पटकाविले यानांही भेट वस्तु देण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होणा-या सर्वाच महिलांंना भेट वस्तू देण्यात आले.


रात्राकालीन पुरुष कबड्डी स्पर्धेत जयपालसिंह मुंडा क्रिडा मंडळ हितकसा या संघाने प्रथम पारितोषिक 11,111/- ग्रामसभा कुकडेल यांचेकडून पटकाविले, द्वितीय नवयुवक क्रिडा मंडळ कुकडेल या संघाने 7,777 /-जि. प. शिक्षक व आरोग्य कर्मचारी आणि विशाल स्पोर्ट्स कोरची यांचेकडून वितरित करण्यात आले तर तृतिय नवयुवक क्रिडा मंडळ मंडावीटोला छत्तीसगढ यांना 5,555 /- नवयुवक क्रिडामंडळ कुकडेलकडुन वितरित करण्यात आले.
पेसा दिवसानिमित्या शुभदाताई देशमुख यांनी सखोल मार्गदर्शन करुन ग्रामसभा व महिला यांना 50 टक्के आराक्षण ,जल, जंगल, जमिन याची मालकी ग्रामसभेची आहे. याची जाणीव करून दिलेत. कुमारीताई जमकातन, झाडुराम हलामी, सियाराम हलामी यांनीही मार्गदर्शन केलेत.
जल, जंगल, जमिनी व ग्रामसभेत महिलांचा सिहांचा वाटा असल्याचे सांस्कृतिक कार्यक्रम व लोकगीत या कार्यक्रमाप्रसंगी युवक -यु़वतीने साजरा केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश नंदेश्वर, बाबुराव सहारे यांनी केले.तर आभार तुकाराम हलामी कुकडेल यांनी मानले. आणि कार्यक्रम यशस्वीतेकरिता ग्रामसभा कुकडेल येथिल बचत गटातील महिला -पुरुष, युवक युवती यांनी अथक परिश्रम केले.