वीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त ‘ युवा परिसंवाद ‘ कार्यक्रम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

आलापल्ली : येथील शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित युवा परिसंवाद कार्यक्रमात विविध विषयावर युवकांशी संवाद साधण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात वीर बाबुराव शेडमाके व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रभारी गृहपाल एम ए रामटेके यांनी युवा परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

सदर युवा परिसंवाद कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले फुलोरा समन्वयक रामदास कोंडागोर्ला यांनी 21 व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी प्रत्येक युवकांनी उच्च ध्येय बाळगून ते प्राप्त करण्यासाठी धडपड केले पाहिजे व गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन शासन प्रशासनात सहभागी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करताना युवकांसमोर असलेल्या देश विदेशातील करिअरच्या अनेक नवीन संधी याबाबत अनेक उदाहरणे व दाखल्यांचा वापर करून पटवून सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य सुरेश येलम यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता नवनियुक्त गृहपाल ए. बी.मेश्राम व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Veer Baburao Shedmake.