घारगावात विलगीकरण कक्षातील रुग्णांना वीर शिवाजी मंचच्या वतीने फळ वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चामोर्शी : तालुक्यात दिवसेंंदिवस कोरोना रुग्णांंच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे घारगाव ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन गावातील जि. प. शाळेत विलगिकरण कक्ष तयार करून कोरोना बाधितांना ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान गावातील वीर शिवाजी मंच यांच्या वतीने कोरोना बाधितांना रोज सकाळी चहा, नास्ता तसेच फळे देण्यात येत आहेत. प्रत्येक रुग्णांना सॅनिटायझर सुद्धा देण्यात आले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव उपकेंद्रातील आरोग्य  कर्मचाऱ्यांकडून कोरोनाग्रस्तांची योग्य ती काळजी घेतली जात आहे.

                                         वीर शिवाजी मंच चे कार्यकर्ते

यात पोलीस पाटील ठेमाजी आभारे, ग्रामपंचायत सदस्य लोमेश भगत, अतुल आभारे, बालाजी झोडगे, तुषार मंगर, शरद मंगर, गणेश भगत, दीपक आभारे, नीरज आभारे, सूरज आभारे, शरद भोयर तसेच पदाधिकारी कोरोना बाधितांना सहकार्य करीत आहेत.

हे देखील वाचा : 

Big BREAKING :अनिल देशमुख यांच्याविरोधात आता ईडीने दाखल केला गुन्हा!

Good News:-कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरतोय, गेल्या 24 तासात 3.29 लाख नव्या रुग्णांची भर

 

 

Ghargaon Grampanchayatlead storyShiwaji Manch Gharagaojn