कोविड-१९ लस घेण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये व्यंकटापूर उपपोलिस स्टेशनच्या पुढाकाराने जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

अहेरी: दुर्गम भागातील नागरिकांत कोरोना लसीविषयी असलेल्या गैरसमजातून, अफवांमधून नागरिक लसीकरण करण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे उपपोलिस स्टेशन व्यंकटापूर चे प्रभारी पोलीस अधिकारी मिलिंद कुंभार यांच्या पुढाकाराने हद्दीतील विविध गावांत चारचाकी गाडीने लाऊडस्पीकर द्वारे कोरोना लसीकरणा साठी जनजागृती करून नागरीकांना लसीकरनासाठी प्रेरित करण्यात आले.

सुरवातीला उप पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण असल्याने त्यांची भीती दूर करून सर्व अधिकारी व अंमलदार यांनी नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर हद्दीतील आवलमरी व व्यंकटापूर या गावामधील ४५  वर्षांवरील नागरिकांसाठी उपपोलिस स्टेशन व्यंकटापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात १०३ नागरीकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली.

तसेच आज बुधवारी १६ जूनला कर्नेली गावातील ४५ वर्षावरील १०० टक्के नागरिकांना लस देण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्र, जिमलगट्टा येथील डॉक्टर व त्यांच्या स्टाफ नी उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी नागरिकांना कोविड – १९ लस  घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याने गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले आहे.

 

हे देखील वाचा  :

आरेंदा येथे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन

उपविभागीय कार्यालय देसाईगंज येथे समतादूत प्रकल्पाच्या वतीने वृक्षारोपण

प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान अंतर्गत मुख्यंमत्री महाआरोग्य कौशल्य अभियान कार्यक्रम

 

lead storysub police station vyenkatapur