आरमोरी न. प. चे ७० सफाई कामगारांनी कुटुंबासाहित केले चक्काजाम आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी 16 जून :- नगर परिषदेने ३ महिन्यापासून कामावरून बंद केलेल्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे,आरमोरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना किमान वेतनानुसार बँकेतुन वेतन अदा करण्यात यावे, सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी व विमा काढण्यात यावा, आरमोरी न.प.च्या मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्याचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरमोरी नगरपरिषदेतील ७० सफाई कामगारांनी कुटुंबासाहित दिनांक १६ जूनला जुन्या बसस्टॉपवर आदिवासी काँग्रेस सेलचे सचिव दिलीप घोडाम, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले.

सफाई कामगार आज सकाळी १० वाजतापासून आपल्या कुटुंबासाहित आरमोरी येथील जुन्या बसस्टॉपवर जमा झाले.सफाई कामगारांना न्याय मिळावा यासाठी प्रहारचे निखील धार्मीक आणि अदिवासी कांग्रेस सेलचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांनी सभा घेऊन सफाई कामगारांच्या ज्वलंत समस्येवर प्रकाश टाकला. यानंतर चक्काजाम आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली. सफाई कामगारांच्या चक्काजाम आंदोलनामुळे गडचिरोली-नागपूर -वडसा मार्गावरील तब्बल अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती.जोपर्यंत आरमोरी न.प.च्या मुख्याधिकारी चक्काजाम स्थळी येऊन सफाई कामगारांच्या समस्या निकाली काढीत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा कामगारांनी घेतल्याने व परिस्थिती चिघळू नये यासाठी आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिगंबर सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी यांना आंदोलनस्थळी पाचारण केले.

यानंतर सफाई कामगारांशी चर्चा केली.परंतु सफाई कामगारांच्या समस्यांवर कुठलाही तोडगा काढलेला नाही.”सफाई कामगारांचा वेतन काढून देऊ परंतु त्यांना कामावर घेण्याचा अधिकार कंत्राटदारावर आहे” असे सांगून मुख्याधिकारी आपल्या गाडीत बसून आपल्या कार्यालयात परतल्या. सफाई कामगारांच्या समस्येचे योग्य निवारण न झाल्याने संतप्त झालेल्या सफाई कामगारांनी परिस्थिती आणखी जास्त चिघळू नये म्हणून पोलिसांनी कामगारांची समजूत काढून कडक बंदोबस्त ठेवला. यानंतर सर्व कामगारांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयात वळविला. आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेऊन सफाई कामगारांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारले.व याबाबत आपण जिल्हाधिकारी ,मुख्याधिकारी यांचेशी चर्चा करून यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सफाई कामगारांना आश्वासन दिले.

सदर चक्काजाम आंदोलनात आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम, प्रहार संघटना आरमोरीचे तालुकाध्यक्ष निखिल धार्मीक तसेच सफाई कामगार संघटनेचे पुरुषोत्तम बलोदे, अक्षय भोयर, स्वप्नील राऊत, रेखा कांबळे, रीना बांबोळे, वर्षा खेडकर ,वर्षा गुरनुले ,वनिता बोरकर ,अविनाश उके, भाऊराव दिवटे, हरिदास गराडे ,साधना गजभिये ,रमेश भोयर ,साधना गजभिये ,गुणवंत रामटेके ,उमेश रामटेके, , तुकाराम बावणे ,उमेश खोब्रागडे , दशरथ दुमाने, राजू नागदेवें, रेखा कांबळे,त्रिशला गोवर्धन,ज्योती मोगरे,कुसुम मेश्राम,गीता शेडमाके, सुरेख मेश्राम,अलका भोयर,राजेश मून, संगीता कांबळे, मंगल मोटघरे,सचिन बोडलकर,,कल्पना साळवे, मंगला मोटघरे,मारोती कोल्हे,आकाश कोल्हे,नितीन मेश्वराम,प्रज्ञा खरकाटे ,सरिता सोनटक्के व इतर कामगार आपल्या कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Armori Nagar PanchayatGadchiroligadchiroli collectorSafai kamgar