आलापल्ली येथे पत्रकार दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली डेस्क 06 जानेवारी:- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त आज दिनांक 6 जानेवारी ला वन विश्राम गृह आलापल्ली येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अहेरी तर्फे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रसंगी बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अहेरी तालुका अध्यक्ष प्रशांत ठेपाले, सचिव शंकर मेश्राम, आसिफ पठाण, मिलिंद खोंड, स्वप्नील तावाडे, सुनील तुरकर, उमेश पेंडयाला, इसरार शेख, रफिक पठाण, आदी उपस्थित होते.

Patrakardin