अवैधरीत्या गांजाची वाहतूक करणार्‍यांना अटक

मूर्तिजापूर येथील कृउबास जवळील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, 10 जानेवारी:- जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्दार क्र. 2 समोर मूर्तिजापूर येथील जावेदखान साहेबखान पठाण व कपिल रतन शितोळे हे दोघे अवैधरीत्या गांजाची तस्करी करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून दोघांनाही पकडले असून त्यांच्या जवळून जवळपास दोन लाखांवर मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

उपरोक् त दोघे आरोपी विना नंबरच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर बसून अवैधरीत्या गांजाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती स्थागुशाला मिळाली.त्यांनी घटनास्थळी छापा मारून या दोघा आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळून 11 किलो 310 ग्रॅम गांजा किंमत 1 लाख 76 हजार, एक वस्तू किंमत 60 हजार, एक धारदार चाकू किंमत 500 रुपये, असा एकूण 2 लाख 36 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई शनिवार, 9 जानेवारी रोजी करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोउपनि सागर हटवार, सपोउपनि राजपालसिंह ठाकूर, पोहवा गणेश पांडे, सदाशिव सुळकर, पोका मो.रफी, रवि इरच्छे, अब्दुल माजिद, गोपाल पाटील, चालक पोशि अनिल राठोड यांनी ही कारवाई केली.

washim