पंचायत समिती सभापती यांनी ताला ठोको चा इशारा देताच अखेर राजाराम मध्ये नाली सफ़ाईस सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी ९ सप्टेम्बर: राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत गावात अनेक दिवसांपासून नाली सफाई झाली नव्हती त्यामूळे गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते .अहेरी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे यांनी ग्रामपंचायत  कार्यालयाला काल कुलूप ठोकण्याचा ईशारा देताच अखेर नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे .

राजाराम ग्राम पंचायत कार्यालय अंतर्गत नाली सफ़ाई व अतिक्रमण हे दोन कामे झाले झाले  नसल्याने ग्राम सेविका यांनी कर्तव्य कसूर केली असल्याच कारणांनी ग्राम पंचायत ला कुलुप ठोकन्यात येणार होते.

मात्र आज पासून राजाराम ग्राम पंचायत नी नाली सफ़ाई करण्याच्या कामाला सुरवात केली आहे.

तसेच येत्या काही दिवसांत  संपूर्ण गावाची नाली सफ़ाई करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले,आज अहेरी पंचायत समितीचे सभापति भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,कृषि विस्तार अधिकारी राऊत , पेसा समन्वयक  संजय कोठारी ,व गावकरी उपस्थित होते,तेंव्हा सदर काम येत्या सात दिवसांत पूर्ण करून देण्याचं ठरले असल्याने सदर कुलुप ठोका आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

 

हे देखील वाचा :

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माहे सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य वाटपाबाबत

 

गडचिरोली जिल्ह्यात 726 तपासण्यांपैकी 1 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

 

गेवरा(खुर्द)परिसरातील नरभक्षक वाघास जेरबंद करा ! खा. अशोक नेते यांचे वनाधिकाऱ्यांना निर्देश

 

rajaramgrampnchyat