बनावट सुगंधित तंबाखू व अवैध दारूविक्री देऊळगावात जोरात

पोलीस विभागाचे बनावट सुगंधित तंबाखू व अवैध दारूविक्री याकडे दुर्लक्ष.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी 02 जानेवारी :- आरमोरी गडचिरोली मार्गावरील देऊळगाव व परिसरातील अनेक गावामधे अवैद्य पणे दारू मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. तसेच देऊळगाव येथील दोन इसम सुगंधित तंबाखूचा मोठा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. दिवसेंदिवस त्यांचा व्यवसाय वाढत असून महिन्याकाठी. लाखोंचा बनावट सुगंधित तंबाखू विकला जात आहे इतकेच नाही तर साध्या तंबाखू पासून बनावट सुगंधित तंबाखू तयार करून त्याची पॅकिंग केली जात असल्याची माहिती आहे. मात्र याकडे पोलीस विभाग व अन्न व औषध प्रशासन विभागाने डोळेझाक केली असल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र या सुगंधित तंबाखू विक्रेत्या वर कठोर कारवाई न करता या व्यवसायाला सबंधित विभागाचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याने या धंद्यांना बळ मिळत आहे. तसेच देऊळगाव, पेठतुकुम, सूर्यडोंगरी, आदी अनेक गावात मोठ्या प्रमाणात देशी व मोह भट्टी ची दारू विकली जात आहे. मात्र पोलीस विभागाच्या अधिकार्‍याने डोळेझाक केल्याने सामाजिक शांतता तसेच नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अवैद्य पणे चालणार्‍या सुगंधित तंबाखू व दारू विक्रीवर पायबंद घालावा अशी मागणी देऊळगाव व परिसरातील नागरिकानी केली आहे.

gadchiroli elegal liqure and tabako