कोरचीत 75 आरोग्य दुतांनी घेतली कोरोना व्हक्सिन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची 01 फेब्रुवारी:- कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात आज कोरोना व्हक्सिन चा पहिला डोज या तालुक्यातील 75 आरोग्य दूतांना देण्यात आला. गडचिरोली पासून 120 किमी अंतरावरील, गोंदिया, राजनांदगांव जिल्ह्याच्या सीमेवरील कोरची तालुक्यात आदिवासी, जंगल व्याप्त, अतिसंवेदनशील नक्षलप्रभावित क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य दुतांना कोविशिल्ड कंपनीची कोविड-19 लस देण्यात आली.

आरोग्य दातांमध्ये ग्रामीण रुग्णालय कोरची चे व आरोग्य केंद्रांअंतर्गत काम करणारे सर्व डाॅक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांचा समावेश होता.
लसीकरण करून घेण्यासाठी प्रथम को-विन वेबसाइटवर नोंदणी करावी लागली. इंटरनेट च्या प्राब्लेममुळे नोंदणी साठी उशीर होत होता. नोंदणी साठी मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, पॅनकार्ड, किंवा 12 पैकी कोणतेही ओळखपत्र दाखवून नोंदणी करीत होते.

फ्रिजरचे निरिक्षण करताना तहसीलदार भंडारी, डॉ. धुर्वे

लसीकरण केंद्रात, प्रतिक्षा कक्ष, निरिक्षण कक्ष, जास्त व्यक्तींना थांबण्यासाठी व्यवस्था होती. जर कुणास जास्त त्रास झाल्यास त्याचेवर तातडीने औषधोपचार करण्यासाठी डाॅक्टरांची चमू तयार होती. लसीकरण दरम्यान कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही हे विशेष.
लसीकरण साठा करण्यासाठी स्वतंत्र कक्षात फ्रेझर उपलब्ध आहे. सूर्यकिरणे पोहोचणार नाही अशी खबरदारी घेतली जात आहे.

ग्रामीण रुग्णालय कोरची चे वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत यांनी सर्वप्रथम लहान टोचून घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिक्षक डॉ. बागराज धुर्वे, तहसीलदार छगनलाल भंडारी, कांग्रेस अध्यक्ष शामलाल मडावी, नंदकिशोर वैरागडे, शालीकराम कराडे, आशिष अग्रवाल, जितेंद्र सहारे,तसेच डॉ. सचिन बरडे, डॉ. लेपसे, डाॅ. वायल, डॉ. नखाते, डॉ. मच्छिरके, डॉ. बोदेले उपस्थित होते.

सोशल मीडियावर व्हायरल अफवा, नकारात्मक बातम्या, आणि लसीच्या परिणामाबाबत चुकीची माहिती पसरू शकते. ते होऊ नये म्हणून प्रत्येकाने सजग राहावे. तसेच कोरोना संसर्ग याविषयी अंतर ठेवणे, मास्क वापरणे, वारंवार होत धूने, या बाबी नियमित करण्याचे आवाहन डॉ. धुर्वे यांनी यावेळी केले.
सोबतच कोविड लस पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 50 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल. यानंतर 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या पण ईतर आजारांने ग्रस्त लोकांना देण्यात येईल. लसीच्या उपलब्धतेच्या आधारे इतर लोकांना लस देण्यात येईल असे डॉ. धुर्वे यांनी सांगितले.


corona vaccinationGadchirolikurkheda