गडचिरोली ग्रामपंचायत मतदानासाठीची तयारी पूर्ण

प्रशासनाकडून मतदारांना मतदान हक्क बजावण्यासाठी आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 14 जानेवारी:- जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायतींमध्ये तयारी पुर्ण झाली आहे. उद्या दि.15 जानेवारी रोजी सकाळी ठिक 7.30 वा ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हयातील सहा कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा तालुक्यातील 499 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये संबंधित गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या सहा तालुक्यातील 170 ग्रामपंचायतीमधील 2 लाख 31 हजार 489 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला 1 लाख 14 हजार 235 तर पुरूष 1 लाख 17 हजार 254 आहेत. उद्या होणाऱ्या निवडणूकिसाठी 499 प्रभागामधून 1124 जागांसाठी 2578 उमेदवार आपले मत आजमावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून 2622 कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी 499 मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य घेवून पोहोचले आहेत.