लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लाहेरी 29 मे:- लाहेरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 138 वी जयंती लाहेरी उप पो स्टे अंतर्गत असलेल्या मौ मल्लम्पोडुर येथील 15 वर्षांची युवा धावपटू प्रियांका लालसू ओकसा हिचे हस्ते सावरकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावलेले वीर सावरकर यांनी क्रांतिकार्याबरोबरच समाजसेवेसाठीही आपले आयुष्य वाहिले. भारतीय समाज हा वर्णव्यवस्थेसारख्या अनिष्ठ प्रथेने बुरसटलेला असून सप्तबंदी या बेडीत जखडलेला आहे. ही सप्तबंदीप्रत्येक भारतीयाने सप्तबंदी म्हणजे वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी. या कुप्रथा झुगारून दिल्या पाहिजेत. याबाबत ते म्हणत की ज्या महार समाजाला निम्न स्थान देण्यात आले, त्याने आम्हाला संत चोखामेळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अलौकिक विचारवंत दिले. जातीभेद रहित समाज निर्मिती साठी त्यांनी सर्व जातींसाठी खुले असणारे पतितपावन मंदिर बांधले.
याच समाजसुधरकाचे जयंती निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षल प्रभावी मल्लमपोडुर येथील गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेली प्रियांका हिने सर्व अडचणींनवर मात करत स्वकर्तुत्वाने भारतीय क्रीडा प्राधिकरण, औरंगाबाद येथे धावणे या क्रीडाप्रकारासाठी स्थान मिळवले असून ती औरंगाबाद येथील ज्ञानेश्वर विद्यालय येथे 9 वी त शिकत सून प्रियांका ने आजपावेतो अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा जिंकून गडचिरोली चे व पर्यायाने देशाचे नाव उज्वल करावे या शुभेच्छा सह तिचा उप पो स्टे चे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी सत्कार केला. व कोरोना महामारीमुळे प्रियांका ही स्वागावी परतली असून घरी राहूनच तिला पुढील वर्गाचा अभ्यास करता यावा या करिता उप पो स्टे तर्फे पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आले.
यावेळी लाहेरी सरपंच पिंडा बोगामी, अलदांडी सरपंच अविनाश मोहंदा उप पो स्टे लाहेरीचे अधिकारी, अंमलदार हजर होते.