गडचिरोली उद्यापासून रंगणार अप्पर डिप्पर क्रिकेट प्रीमियर लीग चा थरार

नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते होणार स्पर्धेचे उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 29 जानेवारी :- अप्पर-डीप्पर या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे दरवर्षी अप्पर-डिप्पर निवडणूक आणि भव्य अशा क्रिकेट प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात येते. यंदाही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पत्रकार, पोलिस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण यासह विविध क्षेत्रांतील मंडळी यात दरवर्षीप्रमाणे सहभागी होत आहेत. शनिवार (ता. ३०) व रविवार (ता. ३१)स्थानिक जिल्हा प्रेक्षागार मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता अप्पर-डिप्पर क्रिकेट प्रिमिअर लीगचे उद्घाटन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार राहतील. विशेष पाहुणे म्हणून जिप सदस्य राम मेश्राम गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांची उपस्थिती राहील. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनंता कुंभारे, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. बाळू सहारे,डॉ प्रशांत चलाख,डॉ तारकेश्वर उईके, उपस्थित राहतील. उद्घाटनीय सामना पत्रकार संघ, लोकप्रतिनिधी संघ व डॉक्टर संघ यांच्यात खेळविण्यात येईल. दुस-या दिवशी रविवारी सकाळी ९ वाजतापासून अप्पर-डिप्पर क्रिकेट प्रिमिअर लीगच्या चार सामन्यांना सुरुवात होईल. पहिला सामना लॉकडाऊन लायन्स विरुद्ध मास्क मॅन यांच्यात, तर दुसरा सामना सॅनिटायझर्स सुपर विरुद्ध क्वारंटाइन किंग्स यांच्यात खेळविला जाईल.

या दोन सामन्यांतील दोन विजेते संघ स्पर्धेच्या जेतेपदासाठी अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात झुंजणार आहेत. तर पराभूत दोन संघ तिस-या क्रमांकासाठी एकमेकांविरोधात लढत देतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता या स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे पत्रकार मनोज ताजणे, अविनाश भांडेकर, सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत उपस्थित राहतील.सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने क्रिकेटपटूनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक अनिल तिडके यांनी केले आहे.

gadchiroli press clubupper dipper club