सावित्रीबाई बरोबर ज्योतिबा घडणेही महत्वाचे- यशोमती ठाकूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती डेस्क 03जानेवारी:- मुलींनी सावित्रीबाई बनण्याबरोबरच मुलांनाही ज्योतीबा बनवणे आवश्यक आहे. त्यांनी महिलांना मान सन्मान दिला पाहिजे, सावित्रीबाई होत्या म्हणून आपण आहोत. सावित्रीबाई यांनी तेव्हा संघर्ष केला म्हणून आज महिला घरा बाहेर काम करताना दिसत आहे. त्यामुळे लेकिना सावित्री बनवण्या बरोबर मुलांना ज्योतिबा बनवावे अस आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सावित्री उत्सवात बोलत होत्या. सावित्रीबाई फुले यांची जयंती ही महिला शिक्षक दिन म्हणून अर्थांत सावित्री उत्सव सगळीकडे साजरा व्हावा यासाठी आमच्या महिला व बालकल्याण विभागाने महिन्यांपूर्वीच तो निर्णय घेतला, अस ही यशोमती ठाकूर म्हणाल्य यावेळी लॉक डाऊन च्या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आला.