कलापथकाद्वारे जनजागृती अभियानाच्या दुसऱ्या टप्याचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 22 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती आणी प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने प्रबंधक डॉ. जितेंद्र पाटील यांचा सूचनेनुसार गडचिरोली जिल्हयातील आरमोरी, वडसा, कुरखेडा या तालुक्यातील 7 गावात दिनांक 23 ऑगस्ट ते दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत कार्याक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, माहिती आणी प्रसारण मंत्रालय भारत सरकार पंजीकृत संस्था, असर फाउंडेशन भंडारा सहकार्याने हा कार्यक्रम सादर करणार आहेत .

यात गौरवशाली 75 वर्षे स्वातंत्र्याच्या लोकशाहीची, एकतेची, विकासाची  यावर आधारित कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, गौरवगाथा शहिदांची, स्वातंत्र्यसेनानींना मानवंदना असा कार्यक्रम सादर होणार आहे .तरी सर्व कोविडचे नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकिय अधिकरी कर्मचारी देशवासियांनी यात सहभागी  व्हावे असे आवाहन माहिती भारत सरकारचे नागपूर कार्यालयाचे तकनीकी सहायक संजय तिवारी यांनी केले आहे.

 

हे देखील वाचा :

नक्षलग्रस्त हेडरी येथे पोलीस भगिनी व स्थानिकांसोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण

kalapathakgadchiroli