नागपुरात उद्या 3 ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

आज जिल्हातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बैठकांचे सत्र सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर  डेस्क १ जानेवारी :- नागपूर जिल्ह्यात उद्या 3 ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम ठेवण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाच्या रंगीत तालीमचं नियोजन जिल्हा प्रशासनानं केल असून यामध्ये नागपुरातील डागा हॅास्पीटल, के. टी. नगर मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि कामठी उपजिल्हा रुग्णालय येथील केंद्रात ही रंगीत तालीम होणार आहे. या तीनही केंद्रात 25 -25 प्रमाणे एकूण 75 जणांना लसीकरन देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले । ही केवळ रंगीत तालीम असून आजच्या बैठकीत लसीकरणाच्या रंगीत तालीमीचे बारकावे ठरवले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातीलच विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयात आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या बैठकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना उद्या होणाऱ्या लसीकरनाच्या रंगीत तालीम मध्ये विविध निर्देश देण्यात येत आहे.

covid vacinenagpur covid vacine trialrangit talim