नागपुरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी  15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर 11 मार्च:- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी  15 मार्च ते 21 मार्च पर्यंत  लॉकडाऊनची घोषणा केली आहे. “नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद.

नागपुरात काल 10 मार्च रोजी 1710, नागपूर शहर 1433, नागपूर ग्रामीण 277 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते. सप्टेंबर 2020 नंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या होती. काल 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे. 

नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लावले जाणार आहे. 15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. नागपूर पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं. या काळात उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील. भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील. लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईल घरपोच सेवा सुरू राहणार आहे. 

nagpur lockdownnitin raut