धक्कादायक ! अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीची 7 लस गायब

अकोल्यातल्या चतरी शासकीय रुग्णालयात घडला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला 17 फेब्रुवारी:- देशभरात सध्या लसीकरणाची मोहिम राबवली जात असताना शासकीय रुग्णालयातून आता कोरोना लस गायबही होऊ लागल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार अकोल्यातल्या चतरी शासकीय रुग्णालयात घडला आहे. इथल्या 7 लस गायब झाल्या आहेत. या रुग्णालयात 450 डोस प्राप्त झाले होते. लस देऊन झाल्यानंतर ४४ लस शिल्लक राहणं अपेक्षित असताना केवळ ३७ लसच उर्वरित राहिल्या आहेत. त्यामुळे ७ लस गहाळ झाल्याचं उघडकीस आलं. 

या संबंधी पोलिसात तक्रार देणं अपेक्षित असतांना ५ दिवस उशिरा चानन्नी पोलिसात आज तक्रार देण्यात आली. उशिरा देण्यात आलेल्या तक्रारी मूळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे आहे. 

akolacovid vanccinevaccinat missing