रेती भरलेल्या टॅकटर ट्रालीवरुन पडून युवकांचा दुर्दैवी मृत्यू

अवैध रेती वाहतुकीत युवकाला गमवावा लागला प्राण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा 30 जानेवारी :- कुरखेडा तालुक्यातील चिचटोला घाटांवर काल मध्यरात्री १ :३० वाजताच्या सुमारास रेती भरुन निघत असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीवर बसलेल्या युवकांचा ट्रालीवरुन पडून निधन झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली. निकेश सदाराम नैताम वय 20 असे मृतकाचे नाव असून मृतक निकेश हा युवक नान्ही येथे लहानपणापासून आपल्या आजी आजोबांकडे राहत होता व मोल मजूरी करीत होता. निकेश नैतामच्या मृत्यूस कारणीभूत कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

मागील बरेच महीन्या पासून कुरखेडा तालुक्यात रेती तस्कराकडून रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात तालुक्यातील अनेक घाटावरुन रेती चोरल्या जात आहे. रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर ट्राली मध्ये रेती भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात हमाल वर्गाला पैशाचा आमिश दाखविला जातो, रेती भरण्यासाठी हमालाना दर ट्रिप मागे तिनशे रूपये दिल्या जाते एका ट्रिप मागे रेती तस्करांना २५०० रुपयांचा फायदा होत असल्याने कुरखेडा शहरात राजरोसपणे रात्री रेती पडत आहे पण याकडे महसूल विभागांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काल रात्री रेती चोरतानी टीपवढी मोठी घटना घडूनही कुठेही वाच्यता व तक्रार नोंद न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तालुक्यात एका मोठ्या रेती तस्कर टोळी ला वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे मात्र एखादा गरजु टकटर मालक घरकामासाठी रेती आणण्यासाठी गेला तर त्या ट्रकटरला पकडण्यासाठी ही टोळी पुढाकार घेत असल्याचे तालुक्यात बोलल्या जात आहे. मागील एका वर्षांपासून रेती घाटांचा लिलाव प्रक्रिया न झाल्याने रेतीच्या तस्करीला उधान आले आहे व अनेकांचे खिसे भरल्या जात आहेत असे तालुक्यातील नागरिक बोलत आहेत.

Gadchirolikurkhedasand back market