कचऱ्यात टाकलेले ऑक्सिजन मास्क पुन्हा वापरण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल… संदर्भात डॉ. श्रीपाद पाटील यांचा खुलासा

अपुऱ्या माहीतीच्या आधारे एका रूग्णाने बनवला व्हिडीओ – डॉ. श्रीपाद पाटील यांचा खुलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदूर्ग, दि. ११ एप्रिल: ऑक्सिजन सप्लाय किंवा डोस देण्याकरीता वापरात येणारे ऑक्सिजन मास्क हे कचऱ्यात टाकलेले पुन्हा वापरण्यात येत असल्याचा व्हिडीओ सिंधुदूर्ग जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रूग्णाने व्हिडीओ काढून तो सर्वत्र सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

मात्र आता जिल्हा रूग्णालयाचे जिल्ह्या शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी हा व्हिडीओ अपु-या  माहीतीच्या आधारे एका रूग्णाने बनवला असल्याचं सांगितलं आहे.

बायोमेडीकल वेस्ट म्हणजेचं त्याची हाताळणी व व्यवस्थापन या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेले नसल्याचं डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितल आहे. रूग्णालय प्रशासनाच्या या बेजबाबदारपणा वर सर्वत्र टीका करण्यात येत होती. जिल्हा रूग्णालय रूग्णाच्या जिविताशी खेळत असल्याचा आरोप देखील या निमित्ताने करण्यात येत होता. मात्र आरोग्य प्रशासनाने खुलासा केल्याने खरे सत्य बाहेर आले आहे.

Dr. Shripad Patil