‘भ्रष्टाचारमुक्त भारत-विकसीत भारत’ ही संकल्पना घेवून दक्षता जनजागृती सप्ताह सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 02 नोव्हेंबर :- ‘भ्रष्टाचारमुक्त भारत-विकसीत भारत’ ही संकल्पना घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. या सप्ताहाच्या अनुषंगाने एन्टी करप्शन ब्युरो गडचिरोली येथील कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात आली. तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्य राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.

6 नोव्हेंबर पर्यंत चालणार्या दक्षता जनजागृती सप्ताहात विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वसामान्य नागरीकामध्ये जनजागृती केली जाणार आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या प्रारंभी इंदिरा गांधी चैक, टी-पाॅईंट गडचिरोली व ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव येथे भ्रष्टाचार विरोधी बॅनर लावून जनजागृती करण्यात आल. तसेच स्थानिक सर्व कार्यालयात पोस्टर लावून व नागरीकांना पत्रके वितरित करून जनजागृती करण्यात आली.

एन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली कार्यालया घेण्यात आलेलया राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाला एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर, विद्या म्हशाखेत्री उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

'VigilanceAwarenessweek