लोकस्पर्श न्युज नेटवर्क
आलापल्ली, 11 मे :- आलापल्ली – अतिदुर्गम आदिवासी भागातील गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील सेवा निवृत्त पदवीधर शिक्षक यांना बालपणापासूनच चित्रकला विषयाची आवड सेवेत असताना ही शालेय स्तरावर विविध कलात्मक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. शैक्षणिक व सामाजिक कार्यात आवड असल्याने चित्रकला च्या माध्यमातून जनजागृती करीत असतात. आलापल्लीत व परिसरात कलेचं कोणतेही वातावरण नाही. परंतु विजय दुर्गे यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देऊन आवड निर्माण केली. एलीमेटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेला मुलं मुली आवडीने बसत आहेत.
विजय दुर्गे उत्तम चित्रकार आहेत . त्यांनी कोरोना व भगवान गौतम बुद्धाचे संदेश देणारी हाताची मुद्रा ही दोन चित्र जलरंगात काढली होती. या दोन चित्रांची निवड राष्ट्रीय स्तरावरील मणिकर्णिका आर्ट गॅलरी झांशी या कला संस्था चे स़ंचालक कामिनी बागेला यांनी विजय दुर्गे
यांच्या दोन चित्रांची निवड केली .ही प्रदर्शनी दिनांक 7/5/2023 ते16/5/2023 या कालावधीत आयोजित केली आहे . या प्रदर्शनात प्रत्येक राज्यातील 73 चित्रकार सहभागी झाले आहेत.