विनम्वी अनिल तुरकर चे पत्रलेखन स्पर्धेत सुयश

  • बालदिनानिमित्त आयोजित पत्रलेखन स्पर्धेत पटकवला भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून प्रथम क्रमांक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

तुमसर, दि. १८ मार्च: राज्यातील शालेय शिक्षण विभागाने या वर्षी प्रत्यक्ष शाळा बंद ठेवल्या तरी विविध उपक्रम राबवून शिक्षणाची ज्ञानगंगा वाहती ठेवली. याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने भाषण, गायन,पत्र लेखन, पोस्टर स्पर्धा, आदी विविध स्पर्धाचे आयोजन दिनांक ८  नोव्हेंबर २०२० ते १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. शालेय शिक्षण विभागा मार्फत यात तालुका, जिल्हा, आणि राज्य पातळीवर आकर्षक बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले होते.  

या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी तुमसर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदमने साहेब, आणि शा.पो.आ. अधीक्षक कटनकर यांनी विशेष प्रयत्न केले. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून “शांती कान्वेंट, अँड पब्लिक स्कूल” मधील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी “विनम्वी अनिल तुरकर” हिने “पत्रलेखन” स्पर्धेत तुमसर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल शाळेच्या संचालिका पडोळे मॅडम, प्राचार्य जितेश ठाकूर, वर्गशिक्षिका रहांगडाले आणि शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.